गुलाबाचे फळ
गुलाबाचे फळ
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात.काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही! चवीला याचा गर तसा आंबट होता.
वाचकांसाठी या गुलाबाचे फोटो टाकत आहे.
अधिक माहीती
गुलाबाच्या नवीन जाती अशाच प्रकारे तयार केल्या जातात. त्यासाठी "आई" झाडावर गुलाबाचे फळ राखून ठेवायचे. ते पुर्ण उमलण्यापुर्वीच त्याच्या पाकळ्या काढून ते फूल एका प्लॅस्टीकच्या पिशवीने झाकून ठेवायचे जेणेकरून त्यावर नको असलेल्या "बाप" फुलाचे परागकण पडून नयेत.आई फूलाचे स्त्रीकेसर पुर्ण तयार झाल्यावर त्यावरची पिशवी सोडून ठरावीक अश्या जातिवंत "बाप" फुलाचे पराग कण टाकावेत. नशीब चांगले असल्यास "आई" फुलाला फळ धरेल. नशीब आणखी चांगले असल्यास ते फळ टिकेल नि पिकेल. नशीब आणखी आणखी चांगले असल्यास त्यापासून तयार झालेले बी उगवेल. आणि शेवटी नशीब अती उच्च असले तर एखादी नवीन जातिवंत फुलाची जात तुमच्या नावावर नोंद होईल.
व्यवसाईक गुलाब उत्पादक "आई" आणि "बाप" फुलांचा जिनॅटीकल अभ्यास करून नवीन तयार होणार्या गुलाबाचा अंदाज बांधून कष्ट कमी करतात. उदा. हायब्रीड टी गुलाब हा टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाबाच्या संकरातून तयार केला गेला आहे. या हायब्रीड गुलाबामध्ये सुद्धा रंग आणि इतर वैशिष्ट्या नुसार बरेच उपप्रकार आहेत.
दुर्दैवाने भारतिय हायब्रीडायजर ची संख्या नगण्य आहे. कारण संशोधनासारखी फालतू कामं करणं आम्हा भारतियांच्या स्वभावात बसत नाही.
मी सुद्धा शेवटी भारतियच म्हणून आपलं नुसतच गुलाबाचं फळ वाढू दिलं. आता बघू माझं नशीब कसं आहे ते.
फळाच्या बुडाशी तयार झालेलं फळ

पक्व झालेल फळ


पक्व फळाचा छेद

फळातील बिया

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home